आजचे राशी भविष्य, दि. १५ एप्रिल २०१९
   दिनांक :15-Apr-2019

 

 
मेष - वायफळ कामांवर वेळ न घालवता तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. तुमच्या विचारांमध्ये बदल होईल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. पैशांने एखादी मोठी समस्या दूर होईल. काही महत्त्वाच्या लोकांशी ओळख होईल. व्यवसायात मोठा फायदा होण्याचा योग आहे. सहकाऱ्यांची मदत मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल.

 

वृषभ - केलेली कामं पुन्हा एकदा तपासून घ्या. दबाव किंवा तणाव कमी होईल. गुंतवणूकीबाबत नवीन संधी येतील. एखाद्या कामात पुढे जाण्यासाठी विचार कराल. नातेसंबंधांमुळे फायदा होईल. व्यवसायात यश मिळेल. अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. पती-पत्नीतील संबंध अधिक दृढ होतील.

 

मिथुन - ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर होती, त्या आज नियंत्रणात येतील. धनलाभाच्या संधी येतील. पैशांसंबंधी यशदायक दिवस आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी विनम्रपणे वागल्यास पुढे जाता येईल. चांगली बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल.

 

कर्क - मित्र-परिवारात तुमची कमी जाणवेल. चांगल्या भेटीगाठी होण्याची तसेच धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही खास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण होतील. आज सुरू केलेल्या कामामुळे तुम्ही अधिक गंभीर आणि जबाबदार व्हाल.

 

सिंह - एखादी मोठी योजना पूर्ण करण्यासाठी तयारी कराल. ऑफिसमध्ये जबाबदारीचे काम मिळू शकते. हे काम पूर्ण केल्याने तुमचा फायदा होईल. एखाद्या अशा व्यक्तीशी भेट होण्याचा योग आहे ज्यामुळे तुम्हाला पुढील दिवसांत मदत होईल. विचार केलेली कामं पूर्ण होतील. आईचे सुख मिळेल. नवीन व्यवसायाची रुपरेखा बनवू शकता. व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराची मदत मिळेल.

 

कन्या - उत्पन्नात वाढ होईल. प्रयत्न कराल तर पैशांसंबंधी स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मेहनत केल्याने धनलाभाचे योग आहेत. लोकांशी भेटल्याने त्यातून फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

 

तुळ - एखादं महत्त्वाचं काम एकट्य़ानेच करावं लागेल. ऑफिसमध्ये एखादी चांगली बातमी मिळेल. काही समस्या असल्यास त्याचं निराकरण होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंदी वाटेल. पैशांसंबंधी तणाव कमी होईल. नवीन व्यवसायाची सुरूवात होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला जाईल.

 

वृश्चिक - सोबत काम करणाऱ्यांची मदत मिळेल. सकारात्मकदृष्टीने काम करा. पैशांसंबंधी जुन्या गोष्टी सोडवल्या जाऊ शकतात. अभ्यासात मन लागेल. व्यवसायासाठी प्रवास होऊ शकतो. संयम ठेवा.

 

धनु - नातेसंबंधांत सुधारणा होईल. सर्वाकडून सन्मान होईल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. नोकरी, व्यवसायात यश मिळेल. विवाहासाठी प्रस्ताव येऊ शकतात. नोकरी, व्यवसायात चर्चा कऱण्यासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधातील तणाव दूर होतील. महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर जोडीदाराची मदत घ्या.

 

मकर - दुसऱ्यांच्या भावना सहजतेने ओळखाल. व्यवसायात यश मिळवण्यासाठी उत्साहाने काम करा. आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे जाल. कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल. चांगली बातमी समजण्याची शक्यता आहे. उत्पन्नासाठी नवीन मार्ग मिळू शकतात.

 

कुंभ - नशीबाची साथ मिळेल. कमी मेहनत करूनही अधिक यश मिळेल. काही गोष्टींमध्ये दिवस चांगला जाईल. अधिकारी कामामुळे प्रभावित होतील. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी विश्वासू लोकांशी चर्चा करा. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.

 

मीन - जबाबदारी वाढेल. नोकरी गोष्टी सामान्य ठेवण्यासाठी तुमच्यापरिने प्रयत्न करा. त्याचा येणाऱ्या काही दिवसांत फायदा होईल. कामात इमानदारी ठेवा. फायदा होईल. घर किंवा नवीन वाहनामुळे फायदा होईल. वैवाहिक जीनवात आनंद वातावरण राहील.