यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज
   दिनांक :15-Apr-2019
मुंबई:
 वाढत्या उन्हाळ्यामुळे जिवाची काहिली होत असतानाच भारतीय हवामान खात्याने आज शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
 
मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल, याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता असते़. दरम्यान, सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीनंतर आज दुपारी मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीएवढाच पाऊस पडेल. यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असला तरी नंतर तो क्षीण होईल. तसेच अखेरीपर्यंत मान्सून आपली सरासरी गाठेल, तसेच एकूण सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खातयाने वर्तवला आहे.