शत्रूवर 'निर्भय' करणार अचूक प्रहार; क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
   दिनांक :15-Apr-2019
ओदिशाच्या किनारपट्टीवर भारताने सोमवारी स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. सबसोनिक निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी होती. २०१३ साली पहिल्यांदा निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. निर्भय क्षेपणास्त्राच्या सुरुवातीच्या काही चाचण्या अपयशी ठरल्या होत्या.
 
 
मिसाइलच्या फ्लाइट कंट्रोल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही समस्या होत्या. त्यामध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) निर्भय क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. या क्षेपणास्त्राचा टप्पा १ हजार किलोमीटरचा आहे.
अमेरिकन नौदलाकडे असलेल्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राच्या धर्तीवर निर्भयची निर्मिती करण्यात आली आहे. निर्भयच्या यशस्वी चाचणीमुळे शत्रूच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची भारताची क्षमता वाढणार आहे.