विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, विजय शंकरला संधी
   दिनांक :15-Apr-2019
मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 :
 
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडी त्याच्या मदतीला असणार आहेत.
 
बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हा संघ जाहीर केला.
 

 
भारतीय संघ
 
शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा
 
 
भारताचे सामने ( वेळ सायंकाळी 3 वाजता)
बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिका
रविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलिया
गुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंड
रविवार 16 जून 2019 : पाकिस्तान
शनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तान
गुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिज
रविवार 30 जून 2019: इंग्लंड
मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश
शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका