रानडुक्कराच्या हल्ल्यात महीला गंभीर जखमी
   दिनांक :15-Apr-2019
 
कामरगाव येथील घटना
 
कारंजा:  तालुक्यातील ग्राम कामरगाव येथील एक महिला रानडुक्कराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना काल  सकाळच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, कामरगाव येथील मंगला शाम पवार ही महिला गावात फिरून शेती मशागतीसाठी लागणारे लोखंडी साहित्य विक्रीचा व्यवसाय करते. १४ एप्रिल सकाळी गावालगत असलेल्या शेतात प्रातःविधी व इंधन गोळा करण्याकरिता गेली असता शेताच्या बांधावरील झुडुपातुन रानडुक्कराने सदर महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या छातीवर जबर मार लागल्याने कामरगाव स्थित रूग्णालय प्राथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या संख्येत वाढ होत असल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.