सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; एक जवान शहीद
   दिनांक :15-Apr-2019
गिरिदीह:
 झारखंडच्या गिरिदीह येथे सोमवारी (15 एप्रिल) नक्षलवादी आणि सीआरपीएफमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सीआरपीएफ जवानांना यश आले आहे. चकमकीदरम्यान एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये नक्षलवादी आणि सीआरपीएफमध्ये चकमक झाली आहे. सीआरपीएफच्या ७ बटालियनने बेलभा घाट येथील जंगल परिसरात स्पेशल ऑपरेशन सुरू केले होते. यावेळी नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. सीआरपीएफ जवानांनी चोख उत्तर देत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून एक एके-४७ रायफल, ३ मॅगजिन्स आणि चार पाइप बॉम्ब इतका शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये भाजपाचा ताफा निवडणूक प्रचाराहून परतत असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात दंतेवाडाचे भाजपा आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला होता, तर चार जवान शहीद झाले होते