मोदींविरोधात वक्तव्य; राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस
   दिनांक :15-Apr-2019
राफेल डील प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना ही नोटीस बजावली आहे.
 
 
न्यायालयाने राहुल गांधींना २२ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. राफेल डीलमध्ये ‘चौकीदार मोदी चोर हैं’ असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींनी या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाशी संबंध लावला असे न्यायालयाने म्हटले आहे.