विद्यार्थिनी सुरक्षित नसणार्‍या ‘त्या’ शाळेची मान्यता रद्द करा
   दिनांक :15-Apr-2019
 
 राजुर्‍याच्या पोलिस निरीक्षकांना तत्काळ निलंबित करा
आमदार संजय धोटे यांची मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे माणगी
राजुरा : आदिवासी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आमदार अॅड. संजय धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे, इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक स्कूलची मान्यता रद्द करून, येथील विद्यार्थिनींना इतरत्र शिक्षण देण्याची मागणी केली आहे. राजुरा येथील हॉटेल चेतन येथे पत्रपरिषद घेऊन त्यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला. ते म्हणाले, 6 एप्रिलला घडलेल्या घटनेची माहिती राजुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळू गायगोले यांनी लपवून ठेवली व त्यांच्या निष्क्रियतेमुळे मुलींवरील अत्याचाराची माहिती तब्बल 13 एप्रिलला कळली. प्रकरण अत्यंत गंभीर असतानाही त्यांनी योग्य ती माहिती न देता जनतेची व पालकांची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना आपण विनंती करणार आहोत असेही ते म्हणाले.