ट्रकची स्कॉर्पिओला धडक; पाच ठार ,पाच जखमी
   दिनांक :15-Apr-2019
 
 
रात्री साडेतीनची घटना
घर एक किलोमीटर राहिले असताना झाला अपघात
मेहकर : भरधाव ट्रकची स्कॉर्पिओला जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात अंजनी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील पाच जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना 14 एप्रिल त्या रात्री 2 ते 2.30 च्या दरम्यान मेहकर डोनगाव रस्त्यावर शेर ए पंजाब ढाब्याजवळ घडली.
 

 
 
 
तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील जुमडे परिवारातील सदस्य मध्यप्रदेशातील महू येथे दर्शनासाठी MH 28 AZ- 1439 क्रमांकाच्या स्कार्पिओ वाहनाने गेले होते. दरम्यान काल 14 च्या रात्री त्यांचे गाव अंजनी बु !! हे अवघ्या एक किलोमीटर अंतरावर राहिले असताना त्यांच्या वाहनाला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रक WB 11--D8488 जोरदार धडक दिली. अपघातात स्कार्पिओचा समोरील भाग चक्काचूर झाला असून गोलू मनोहर जुमडे वय 22 जयवंता श्रीरंग जुमडे वय 60 राजरत्न विकी जुमडे वय सहा महिने व कोमल विकी जुमडे वय 23 वर्ष हे चार जण घटनास्थळी चार जण ठार तर मनोहर पुंडलिक जुमडे 50 यांना औरंगाबादला नेत असतांना त्यांची प्राणज्योत मालवली आहे . ताई मनोहर जुमडे 45,नेहा मनोहर जुमडे 22 प्रतीक संतोष जुमडे 15 विशाल खरात 25 हे चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कमल विश्वास जुमडे 50 त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. घर अवघ्या एका किलोमीटर राहिले असताना अपघातात एकाच कुटुंबातील पाच सदस्य ठार झाल्यामुळे अंजनी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा तपास डोणगाव पोलिस करीत आहेत.