वर्धेत ७५ टक्के पाणी जाते वाया
   दिनांक :15-Apr-2019
 
 
 वर्धा: वर्धेत कधी नव्हे तेवढा दुष्काळ यावर्षी पडणार आहे. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन भविष्यात पाणी टँचाई जाणून नये यासाठी प्रयत्न केले.परंतु, वर्धेकरांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. याही शिवाय धाम नदीतून वर्धेला येणारे ७५ टक्के पाणी जमिनीत मुरत असल्याने वर्धेकरांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
 

 
 
वर्धेला महाकाली येथील धाम नदीवर तयार करण्यात आलेल्या महाकाली धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील धरणातील पाण्याची पातळी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात खालावत गेली. आज शहरात दर सहा दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यास पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाकली धरणातून येणारे पाणी नदी मार्गानेच खरंगण, आजी (मोठी), येलाकेळी, पुढे पवनार पर्यन्त जाते. पाणी पुरवठा नियोजन बद्ध व्हावा यासाठी शहरातील काही भागात येलाकेळी येथून तर काही भागात पवनार येथून पाणी पुरवठा करण्यात येतो. दुर्दैवाची बाब म्हणजे आज पर्यन्त वर्धेला भीषण पाणी टँचाई न जांनवल्याने म्हणा किंवा दूरदृष्टीचा अभाव असल्यामुळे भविष्यात पाणी टँचाईवर मात करण्यासाठी नियोजन झालेच नाही. महाकली ते येलाकेळी या ३६ किमी अंतरात नदीतून येणारे ७५ टक्के पाणी जमिनीत मुरून जात असल्याने केवळ येलाकेळी येथे २५ टक्केच पाणी जमा होते. तर दुसरीकडे नपने पवनार येथील धाम नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातील गाळ काढल्याने त्या ठिकाणी पाणी साठा मोठ्या प्रमाणावर राहतो.
 

 
 
 
आज महाकाली धरणात ६ एमएम क्यू एवढेच नाही शिल्लक आहे. त्यात वर्धेकराची तहान भागणे शक्य नाही. येलाकेळी येथे आत्ता१५ ते २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती नपचे प्रशासकीय अधिकारी साखरकर यांनी दिली. महाकली धरणावरून येलाकेळी या ३६ किमीपर्यन्त पाणी आणण्यासाठी पाईपचा वापर केला तर आज जमिनीत मुरणारे ७५ टक्के पाणी वर्धकरणाची तहान भागवू शकले असते. परंतु, नियोजन शून्य कारभारने आजपर्यंत या महत्वाच्या विषयाकडे कोणी लक्ष दिले नाही. परिणामी आत्ता पाणी टंचाई जाणून लागली आहे.