भाजपाच्या सत्ताकाळात पाक, चीनला धाडस परवडणार नाही
   दिनांक :15-Apr-2019
- योगी आदित्यनाथ यांचा दावा
राऊरकेला,
दहशतवाद आणि नक्षलवादाच्या मुद्यावर कॉंगे्रसने नेहमीच मवाळ भूमिका घेतली आहे, असा आरोप करताना, भाजपा सरकारने मात्र यावर अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे. जगात अतिशय मजबूत राष्ट्र म्हणून उदयास आलेल्या भारताच्या विरोधात अनावश्यक धाडस करण्याची िंहमत आता चीन आणि पाकिस्तानलाही परवडणारी नाही, अशी स्पष्ट भूमिका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सोमवारी येथे विशद केली.
 
 
 
कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकारच्या काळात चीनच्या सैनिकांकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करणे, हा नित्याचाच भाग बनलेला होता; पण मोदी सरकारने डोकलाम मुद्यावर अतिशय कणखर भूमिका घेतली आणि चीनला माघारी फिरण्यास भाग पाडले. अरुणाचल प्रदेशच्या अन्य भागांमध्येही चीनच्या सैनिकांना माघार घ्यावी लागली होती. अनावश्यक धाडस मोदी सरकार खपवून घेणार नाही, याची जाणीव चीन झालेली आहे, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.
 
पाकिस्ताननेही हा अनुभव घेतलेला आहे. उरी येथील दहशतवादी हल्ला आणि पुलवामा येथील आत्मघाती हल्ला, ही त्याची उदाहरणे आहेत. भारतावर हल्ला करणे आता पूर्वीसारखे सोपे राहिले नाही, हे या देशांना कळून चुकले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.