मुलीच्या अद्वितीय साहसाने वाचले बालकाचे प्राण
   दिनांक :16-Apr-2019
 
 
 
 
मानोरा : तालुक्यातील गीरडा येथील विहीरीत पडलेल्या बालकाला पोहात येत नसलेल्या मुलीने आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या अद्वितीय साहसाने ५ वर्षीय बालकाचे प्राण वाचविल्याने तिचे सर्वत्रत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील गीरडा गावातील महीला नेहमीप्रमाणे गावालगतच्या विहीरीवर नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यात रोशनी ज्ञानेश्वर पवार ही 13 वर्षाची मुलगी आापल्या घरचे कपडे धुण्यासाठी विहीरीवर गेली होती. रोशनी ही इयत्ता सहाव्या वर्गात गावातीलच यशवंतराव चव्हाण विद्यालयात शिक्षण घेत असून, आपले घरातील कपडे धुत असतांना गावातीलच पाच वर्षाचा गणेश जाधव विहरीरीवर आला व त्याचा तोल गेल्यामुळे तो विहीरीत पडला.  वाचवा.. वाचवा... असा कल्लोळ सुरू असतानां रोशनी पवार हीने क्षणाचाही विलंब न करता आपल्या कल्पक बुद्धीने विहिरीत असलेल्या कड्याच्या सहाय्याने विहिरीत उतरली. विहिरीत पडलेला बालक हा तिच्या सोबत धुण धुण्यासाठी आलेल्या मैत्रीणीचा भाऊ होता. सदर मुलगा आई वडीलांना एकुलता एक होता. कड्याच्या साह्याने विहीरीत उतरल्यावर बुडत्या गणेशचा हात धरुन वर काढले व कडीला धरुण गणेशला पकडून ठेवले. नंतर गावातील मंडळीच्या साहायाने पाच वर्षीय बालकाला वर काढले.
रोशनीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रस्तुत प्रतिनिधीने गीरडा येथील पोलिस पाटील दयाराम एकनाथ सोनुने यांच्या माध्यमातून थेट रोशनीकडे संपर्क साधला असता रोशनीने घडलेली हकीकत सांगीतली. घटना घडून तब्बल १५ दिवसाचा कालावधी उलटला असून रोशनीचे धाडस प्रसिद्धीपासून दुरच राहीले, हे मात्र विशेष.