ईशान खट्टरला 'का' भरावा लागला दंड
   दिनांक :16-Apr-2019
अभिनेता ईशान खट्टरला पार्किंगचे नियम मोडणे महागात पडले आहे. इशानने पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
 
 
 
मुंबईतील ट्रॅफिकमुळे ईशान त्याच्या स्पोर्ट्स बाइकने अनेकदा मुंबईत फिरतो. सोमवारी ईशान मुंबईतील वांद्रे येथे जिम झाल्यावर जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तिथे त्याने त्याची स्पोर्ट्स बाइक पार्क केली परंतु, त्यानं लावलेली बाइक नो पार्किंग झोनमध्ये होती. पोलीस त्याची बाइक घेऊन जाणार असल्याचे कळल्यावर ईशान रेस्टॉरंटमधून धावत बाहेर आला आणि बाइक 'टो' न करण्याची विनंती त्याने पोलिसांना केली. शेवटी पोलिसांनी ईशानकडून ५०० रुपयांचा दंड आकारला आणि त्याला बाइक घेऊन जाण्याची परवानगी दिली.
वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने नुकतेच अभिनेत्री सारा अली खानलाही दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली होती.