किंगमेकरची भूमिका चंद्रशेखर राव बजावणार का?
   दिनांक :16-Apr-2019
तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून दुसर्‍यांदा शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय राजकारणात िंकगमेकरची भूमिका पार पाडण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. या स्वप्नासोबत िंकग होण्याचे अतिरिक्त स्वप्नही चंद्रशेखर राव एआयएमआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी यांच्या सौजन्याने पाहू लागले आहेत.
 
 
 
तेलंगणा राज्य निर्मितीसाठी चंद्रशेखर राव यांनी दिलेला आक्रमक लढा अभूतपूर्व असा म्हणावा लागेल. त्याचीच परिणती म्हणून तेव्हाच्या संपुआ सरकारला आंध्रप्रदेशचे विभाजन करून नव्या तेलंगणा राज्याची निर्मिती करावी लागली. आंध्रप्रदेशच्या विभाजनाचा सर्वाधिक राजकीय फायदा चंद्रशेखर राव यांचा झाला, तर सर्वाधिक नुकसान कॉंग्रेसचे झाले.
तेलंगणाच्या निर्मितीनंतर राज्यात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत चंद्रशेखर राव यांनी बाजी मारली, आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राव यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. पाच वर्षाचा कार्यकाळ संपायच्या आधीच राज्यातील अन्य सर्व विरोधी पक्षांना बेसावध ठेवत विधानसभा निवडणुका घेत राज्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. 119 पैकी 88 जागा िंजकत राव यांनी दुसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
 
लोजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान वार्‍याची दिशा ओळखून निर्णय घेण्यासाठी प्रसिध्द आहे, चंद्रशेखर राव आता त्यांच्याच पावलावर पाउल टाकत आहे. आपल्या धडाकेबाज कामगिरीने राव यांनी राज्यातील विरोधी पक्षांचा पार पालापाचोळा करून टाकला. येथूनच चंद्रशेखर राव यांच्या राजकीय महत्वाकांक्षांनी झेप घेतली. अन्य प्रादेशिक नेत्यांप्रमाणे त्यांनाही राष्ट्रीय राजकारणाची आणि त्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडण्याची स्वप्ने पडू लागली.
 
चंद्रशेखर राव यांनी कॉंग्रेसमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. 1983 मध्ये राव यांनी तेलगू देसममध्ये प्रवेश केला. पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. 1985 मध्ये सिद्धीपेट विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विजयी झाले. 1999 पर्यंत सलग चारवेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला.
1988 मध्ये एन. टी. रामाराव यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा त्यांचा मदत आणि पुनवर्सन मंत्री म्हणून समावेश झाला. नंतर चंद्राबाबू नायडू मंत्रिमंडळातही परिवहन मंत्री म्हणून राव यांनी काम केले. 2000-2001 मध्ये आंध्रप्रदेश विधानसभेचे उपसभापतिपदही राव यांनी भूषवले.
 
तेलंगणातील जनतेवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात चंद्रशेखर राव यांनी उपसभापतिपदाचा तसेच तेलगू देसमचाही राजीनामा देत तेलंगणा राष्ट्र समिती या नव्या पक्षाची स्थापना केली. तेलंगणाचे वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी चंद्रशेखर राव यांनी आपला लढा सुरू केला, त्याला जनतेचा प्रतिसादही मिळू लागला.
 
2004 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांनी कॉंग्रेसशी आघाडी केली. कॉंग्रेसने वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीला पािंठबा दर्शवला. या निवडणुकीत राव यांच्यासह तेलंगणा राष्ट्र समितीचे पाच खासदार निवडून आले. संपुआचा मित्रपक्ष म्हणून चंद्रशेखर राव यांचा डॉ. मनमोहनिंसग मंत्रिमंडळात श्रम आणि रोजगार मंत्री म्हणून समावेश झाला. मात्र सत्तेत आल्यावर कॉंग्रेस वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी काही करत नाही, हे लक्षात आल्यावर राव यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एवढेच नाही तर संपुआ सरकारला असलेला आपल्या पक्षाचा पािंठबा काढून घेत खासदारकीचाही राजीनामा दिला.
 
2009 ची लोकसभा निवडणूक राव यांनी तेलगू देसम आणि अन्य पक्षांसोबत लढवली. मेहबुबनगर लोकसभा मतदारसंघातून राव विजयी झाले. चंद्रशेखर राव यांच्या दबावामुळे वेगळे तेलंगणा राज्याची निर्मिती संपुआला करावी लागली.
2014 च्या निवडणुकीत राव यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी लढवली. मेडक लोकसभा तसेच याच जिल्ह्यातील गजवेल विधानसभा मतदारसंघातून राव विजयी झाले. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील लोकसभेच्या 17 पैकी 11 जागा तर विधानसभेच्या 119 पैकी 66 जागा िंजकल्या. साध्या बहुमतामुळे चंद्रशेखर राव यांनी सरकार स्थापन करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
तेलगू देसमचा एक, दोन अपक्ष आणि कॉंग्रेसच्या 10 आमदारांना तेलंगणा राष्ट्र समितीत समावून घेत राव यांनी तेलंगणा राष्ट्र समितीचे संख्याबळ शंभरावर नेले आणि राज्यातील विरोधी पक्षांचे पार खच्चीकरण केले. आता लोकसभा निवडणुकीत राज्यातील 17 पैकी 16 जागा िंजकण्याचे लक्ष्य राव यांनी ठेवले आहे. यासाठी त्यांनी असदुद्दिन ओवैसी यांच्या एआयएमआयएमशी आघाडी केली. राज्यातील लोकसभेच्या 17 पैकी 16 जागा तेलंगणा राष्ट्र समिती लढवत असून एक जागा असदुद्दिन ओवैसी यांच्या पक्षासाठी सोडली आहे.
 
लोकसभा निवडणुकीनंतर कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, हे गृहित धरून आपल्याला िंकगमेकरची भूमिका बजावता येईल, असे राव यांना वाटू लागले आहे. त्यामुळेच मला 16 खासदार द्या, मी देशाचा चेहरामोहरा बदलून टाकील, असे राव आपल्या प्रचारसभेत म्हणत आहे. माझ्याजवळ दोन खासदार असतांना मी तेलंगणाचे वेगळे राज्य बनवले, मला 16 खासदार दिले तर मी देशात क्रांती घडवून आणीन, असे राव सांगत आहे. त्यामुळे लोकसभेच्या 16 जागा िंजकण्यासाठी राव यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
 
िंकगमेकरच्या भूमिकेचे स्वप्न पाहात असताना असदुद्दिन ओवैसी यांनी राव यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला न मागता पाठिंबा देऊन टाकला. त्यामुळे राव यांनाही आपण पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत उतरावे असे वाटू लागल्यास आश्चर्य नाही. मात्र राव यांना पंतप्रधानपदापर्यत मजल मारणे वाटते तितके सोपे नाही, याची जाणीव त्यांनाही निश्चितच आहे.
 
भाजपाला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी काही जागा कमी पडल्यातर चंद्रशेखर राव भाजपाला पािंठबा देऊ शकतात. चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती आज रालोआचा घटक पक्ष नसला तरी उद्या तो होणारच नाही, असे नाही. त्यामुळेच भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारात चंद्रशेखर राव यांच्यावर फारजास्त टिका करत नाही. चंद्रशेखर रावही भाजपापेक्षा कॉंग्रेस आणि तेलगू देसमला आपले लक्ष्य करत आहे.
 
तसेही चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम रालोआतून बाहेर पडल्यानंतर दक्षिण भारतात भाजपाला एका मजबूत मित्रपक्षाची गरज आहे, ही गरज चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती पूर्ण करू शकते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर िंकगची नसली तरी िंकगमेकरच्या भूमिका निभवणे चंद्रशेखर राव यांच्यासाठी कठीण नाही.
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817