हर्षवर्धन जाधव-अब्दुल सत्तार युती
   दिनांक :16-Apr-2019
 
 
औरंगाबादचे कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पािंठबा जाहीर केला आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन सत्तार यांनी पािंठबा घोषित केला.
यापूर्वीही हर्षवर्धन जाधव यांना शांतिगिरी महाराजांनी पािंठबा दिला आहे. शांतीगिरी महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील िंहदू धर्मीयांचं मोठं शक्तीस्थान मानलं जातं. सत्तार आणि शांतिगिरी महाराजांच्या पािंठब्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर युतीचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

 
 
अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला होता. मात्र दिलजमाई झाल्यानंतर सत्तार यांनी अर्ज मागे घेतला. परंतु हर्षवर्धन जाधवांना त्यांनी पािंठबा दिला आहे.
मध्यंतरी रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटले होते, हर्षवर्धन यांनीही आपण निवडून आल्यास नरेंद्र मोदींना पािंठबा देण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या भेटीचा आणि सत्ताधार्‍यांच्या पािंठब्याचा काही संबंध आहे का याची देखील कुजबूज सध्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सुरू आहे.
 
औरंगाबादमधून शिवसेना-भाजप महायुतीतर्फे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. कॉंग्रेसकडून सुभाष झांबड यांना तिकीट देण्यात आलं आहे. एमआयएम राज्यात लोकसभेची एकमेव जागा लढवणार असून ती औरंगाबादची जागा आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे निवडणूक लढवत आहेत.
हिंदू मतांचं विभाजन टाळण्यासाठी शांतीगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. 2009 मधील लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहिलेल्या शांतीगिरी महाराजांना जवळपास दीड लाख मतं मिळाली होती, आणि ते तिसर्‍या क्रमांकावर होते.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हा ‘हँग झालेला नेता’ असल्याची टीका अब्दुल सत्तार यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण आणि अकलेचा संबंध असता, तर त्यांनी 2014 ची निवडणूक िंजकली असती, अशी टीका अब्दुल सतार यांनी केली.