ऊर्मिलाच्या प्रचारात मोदी, मोदीचे नारे
   दिनांक :16-Apr-2019
एकीकडे भाजपाच्या महिला उमेदवारांना अश्लील टिपण्णीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कार्यकर्त्यांच्या अश्लील नाचाचा सामना करावा लागला आहे. यावर मातोंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस संरक्षणाचीही मागणी केली आहे. या हुल्लडबाजींमध्ये एक महिला प्रवासी पडल्याने जखमी झाली आहे.
 

 
 
बोरिवलीमध्ये सोमवारी सकाळी हा घाणेरडा प्रकार घडला. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या प्रचार करत होत्या. यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. तसेच ‘मोदी मोदी’च्या घोषणा दिल्या. यामुळे तेथील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे समजते.
उर्मिला मातोंडकर या रेल्वे स्थानक आवारात प्रचार करत होत्या. यावेळी अचानक 8 ते 10 जण त्याठिकाणी आले. त्यांच्या गळ्यामध्ये भाजपचा पट्टा होता. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एक पॅसेंजर महिला खाली पडून किरकोळ जखमी झाली. यानंतर बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
 
 
वाद काय?
दरम्यान, उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही ऊर्मिलानं मुंबईकर असल्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. मी मुंबईकर आहे आणि याआधीही होती आणि यापुढेही राहणार आहे, याबाबत मला कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. मी स्टार म्हणून ही निवडणूक लढवीत नाही. आपल्या लोकशाहीमध्ये संपूर्ण जनता हीच खरी स्टार आहे. मी कॉंग्रेसची विचारधारा घेऊन ही निवडणूक लढणार आहे. एक चांगला विचार घेऊन मी या क्षेत्रात उतरलेली आहे, असंही ऊर्मिला मातोंडकर म्हणाली आहे.
 
मला ट्रोल करणारे हे इस्लामला एका विशेष रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कधीही धर्मांतर केलेलं नाही. माझ्या पतीला जेवढा मुसलमान असल्यावर गर्व आहे, मलाही तेवढाच िंहदू असल्याचा गर्व आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ऊर्मिलानं मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिला ट्रोल केलं जातं होतं. त्या ट्रोलर्सना तिनं या मुलाखतीच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मला जातीवरून ट्रोल करणारे लोक द्वेष आणि बदल्याचं राजकारण करतात. तसेच यावेळी त्यांनी भाजपाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कोणतीही व्यक्ती गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासावर बोलत नाही. ट्रोलर्सनी दाखवून दिलं आहे की ते कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात. त्या सगळ्यांनच वाटतं की राजकारणात एक ग्लॅमर डॉल आली आहे. मी बोलण्यापेक्षा माझ्या कामातून उत्तर देईन, असंही ऊर्मिला म्हणाली आहे.
 
उर्मिला मातोंडकर यांच्या पायाखालची वाळू सरकली असून पराभव त्यांना दिसू लागल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप त्या करत आहेत. 2014 झाली गोपाळ शेट्टी यांनी कॉंग्रेसच्या संजय निरुपम यांचा 4 लाख 46 हजार मतांनी दारुण पराभव केला होता. आता त्यांचा यापेक्षा जास्त मतांनी पराभव होणार असल्याने त्या बिनबुडाचे आरोप करत आहे.