शशी थरुरांच्या भेटीला निर्मला सितारमण
   दिनांक :16-Apr-2019
नवी दिल्ली :
 केरळातील तिरुवअनंतपुरम येथे एका मंदिरात पूजा करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर यांचा काल अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज, मंगळवारी संरक्षणमंत्री आणि भाजपा नेत्या निर्मला सितारमण यांनी शशी थरुर यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
 
 
निर्मला सितारमण यांनी भेट घेतल्याची माहिती शशी थरुर यांनी आपल्या ट्विटर पेजवरुन दिली आहे. केरळमधील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना सुद्धा आज सकाळी निर्मला सितारमण यांनी रुग्णालयात येऊन माझी भेट घेतली. त्यांच्या या स्वभावाबद्दल मला मनापासून बरे वाटले. भारतीय राजकारणातील सभ्यता एक दुर्मीळ गुण आहे. हेच त्यांच्याकडून होताना दिसून आले, असे शशी थरुर यांनी म्हटले आहे.