अमरावतीच्या विकासासाठी अडसुळांना विजयी करा - गडकरी
   दिनांक :16-Apr-2019
 
 
 
 
केंद्रीय मंत्री गडकरी यांचे जनतेला आवाहन
अमरावती: अमरावतीच्या विकासासाठी खा. आनंदराव अडसुळांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्याविरोधात उभे असणार्‍यांचा इतिहास काय आहे, हे जिल्ह्यात सर्वांना माहीती आहे. आनंदराव बानकशी सोने आहे. तुम्हाला प्युवर माल पाहिजे का हायब्रीड, ते ठरवा. जर प्युवर माल पाहिजे असेल तर आंनदाराव यांच्या धन्युष्यबाणा समोरील चिन्हाचे बटन दाबा आणि त्यांना विजयी करा. देशात मोदींच्या नेतृत्वात मजबुत सरकार आणण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 

 
 
 
अमरावती लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ स्थानिक दसरा मैदान येथे सोमवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गरिबी हटविण्याची घोषणा दिली होती. त्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधीनी गरिबी हटविण्याची घोषणा दिली, त्यांच्यानंतर राजीव गांधी व सोनिया गांधींनी सुध्दा गरिबी हटाओची घोषणा दिली. आता 72 वर्षानंतर परत पंडीतजींचे पणतु राहुल गांधी हे गरिबी हटाओची घोषणा देत आहे. गेल्या 72 वर्षात या देशातील गरिबी हटली काय? गरिबी हटली केवळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची, त्यांच्या चेलेचपाट्यांची व चमच्यांची, अशी टिका नितीन गडकरी यांनी केली.