अल्पवयीन युवतीचे लैंगिक शोषण
   दिनांक :16-Apr-2019
गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
 
गिरड: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची घटना उघडिस आली .या प्रकरणी चेतन विनोद तिमांडे रा. कोरा(उसेगाव) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .गेल्या काही महिन्यापूर्वी अल्पवयीन युवतीला लग्न करण्याचे आमिष दाखवले व लैंगिक शोषण करण्यास भाग पडल्याचे पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपीच्या विरुध्द बाललैंगिक प्रतिबंध कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार महेंद्र ठाकुर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक माधुरी गायकवाड करीत आहे.