'स्विगी'चा फूड डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात
    दिनांक :16-Apr-2019
बंगळुरु,
'स्विगी' या फूड डिलीव्हरी करणाऱ्या ऑनलाईन अॅपचा अधिकारी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. जेनिफर रसेल बंगळुरु मध्य मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरत आहे. जेनिफर रसेल हा केरळमधील तिरुअनंतपुरमचा रहिवासी आहे. बंगळुरु मध्य मतदारसंघात रसेलसह 22 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जेनिफर रसेलने डिश अँटेना हे निवडणूक चिन्ह निवडलं आहे.

 
 
 
काहीतरी आव्हानात्मक करण्याच्या इराद्याने रसेलने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी रसेलने टेलिकॉम इंडस्ट्रीतील आपल्या भरपगारी नोकरीला रामराम ठोकला होता. आधी त्याने उबर जॉईन केलं. त्यानंतर 'स्विगी'मध्ये फूड डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून तो रुजू झाला.
 
सुरुवातीला आपण एसीमध्ये कारने प्रवास करायचो, मात्र आता बाईकवरुन जाताना प्रदूषण, रस्त्यावरील खड्डे, अस्वच्छता, कचऱ्याची दुर्गंधी, वाहतुकीच्या समस्या, पार्किंगचे प्रश्न आपल्याला समजले, असं त्याने सांगितलं. बंगळुरु मध्य मतदारसंघातून भाजपने संघ परिवारात कार्यरत तेजस्वी सुर्या यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसतर्फे बीके हरिप्रसाद निवडणूक लढवणार आहेत.