आजचे राशी भविष्य, दि. १५ एप्रिल २०१९
   दिनांक :16-Apr-2019
 

मेष - मागील काही दिवसांपूर्वींपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील नाती अधीक बहरण्याचे योग आहेत. विचार केलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्साहपूर्ण दिवस राहिल. लग्न झालेल्या मंडळींना आनंद मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ - कामकाजात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात सन्मन मिळेल. मेहनतीने धन प्राप्त कराल. मागील काही दिवसांपूर्वींपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवहार होण्याची शक्यता आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी योग्य बदल करण्याची गरज आहे. प्रवासाचे योग आहेत.

मिथुन - घाई-घाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. आर्थिक कणकण भासेल. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यावसायातील समस्या वाढण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधी तणाव कमी होईल. परिस्थितीत सुधारणा होईल. भावंडांची मदत मिळेल. एखाद्या व्यक्तीशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे आनंदी राहाल.

कर्क - नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात. जिद्दी स्वभावामुळे विवाद होण्याची शक्यता आहे. जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका. अचानक अडचणी येण्याची शक्यता आहे. कामकाजात विध्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा मूड खराब राहिल.

सिंह - कुटुंबातील नाती अधीक बहरण्याचे योग आहेत. सामाजिक कामकाजात सन्मान मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या मित्रांसोबत भेटी होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये गुप्त रीत्या कोणी मदत करेल. साथीदाराकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.

कन्या - जुन्या समस्येचे निराकरण होईल. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. काही लोक तुमच्याकडे अधिक लक्ष देतील. एखाद्याला मदत कराल, वेळ पडल्यास तुम्हालाही मदत मिळेल.

तुळ - अनेक गोष्टींसाठी दिवस शुभ आहे. जीवनात काही नवीन बदल होऊ शकतात. अचानक एखादे जुने काम पूर्ण होऊ शकते. आज होणाऱ्या ओळखी फायद्याच्या ठरतील. अनेक लोकांशी होणारी चर्चा फायदेशीर ठरेल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.

वृश्चिक - नोकरी, व्यवसायात काही चांगल्या गोष्टी होऊ शकते. त्यामुळे फायदा होईल. नवीन लोकांशी भेट होईल. धनलाभ होण्याचा योग आहे. आज होणारे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. खुल्या मनाने विचार करा.

धनु - बुद्धिमत्तेच्या बळावर अनेक गोष्टी निभावून न्याल. नोकरदार वर्गाला सहकाऱ्यांची मदत मिळेल. सहज पुढे जाल. जी कामं तुमच्यावर सोपवण्यात येतील ती पूर्ण करा. जास्तीच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील.

मकर - नवीन व्यवहार करणे आज शक्यतो टाळा. पैसे अडकण्याची शक्यता. दिवसाची सुरूवात मध्यम स्वरूपाची असू शकते. कुटुंबातील व्यक्ती अडचणी टाकण्याची शक्यता आहे. केलेल्या योजना गुप्त ठेवा. वाद-विविदांमध्ये अडकण्याची शक्यता.

कुंभ - आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. उत्पन्न आणि खर्च सम प्रमाणात राहिल. ऑफिसमध्ये आधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. आपत्यांकडून चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत.

मीन - जून्या कामांचा जास्त फायदा होईल. जुन्या मित्रांची अचानक मदत होईल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा बेत आखाल. जी कामं महत्त्वाची आहेत, ती आजच पूर्ण कराल. दिवस शांततेत व्यतीत होईल. कोणती अडचण असेल, तर त्याविषयीची महत्त्वाची सुचना मिळेल.