वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एका महिलेचा मृत्यू
   दिनांक :17-Apr-2019
ब्रम्हपुरी,
मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला केला करून ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील वनपरिक्षेत्र नवेगावमधील कक्ष क्रमांक १५७ मध्ये घडली. गीता गोपाल गावतुरे असे मृतक महिलेचे नाव आहे. महिनाभरातील ही तिसरी घटना आहे.
 
जंगलात वाघाने महिलेच्या नरडीचा घोट घेतला.९ सहकारी महिला-पुरूषांनी आडाओरड करून वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला. पण, वाघाने डरकाळी फोडली. जीवाची पर्वा न करता इतरांनी गीताचे पाय खेचून वाघाच्या तोंडातून सोडविण्याचा प्रयत्न केला. अथक परिश्रमानंतर गीताची वाघाच्या तोंडातून सुटका केली आणि वाघाला हाकलून लावले. जखमी गीतासह सहकारी ग्रामस्थांनी गावाची वाट धरली. परंतु, नियतीला मान्य नसल्याने अर्धा किलोमिटर अंतर गाठताच गीताचा प्राणज्योत मालावली. ग्रामस्थांसह पोटच्या दोन गोळ्यांनी एकच हंबरडा फोडला. वनाधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली. पण, तब्बल दोन तास उशिराने वनाधिकारी पोहचल्याने गावकर्‍यांनी संताप व्यक्त केला. 
 
 
शेतीचा हंगाम आटोपल्यानंतर या परिसरात रोजगाराचे साधन उपलब्ध नाही. रोहयोची कामेही बंद आहेत. त्यामुळे येथील नागरिक मोहफुल वेचून कुटुंबाचा उदरनिवार्ह करीत असतात. वन्यप्राण्यांच्या तोंडात घास ठेवून या परिसरातील नागरिक मोहफुल वेचणीसाठी जातात. याआधी रामपुरी येथील जानकीराम भलावी, नवेगाव येथील अनुसया मुरलीधर बनकर यांचा वाघाने बळी घेतला. तर, बळीरम तुळशीराम उईके जखमी झाले होते. वाघाचा बंदोबस्त करावा, यासाठी विविध आंदोलने करण्यात आली. पण, अजूनही वाघाचा बंदोबस्त करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे. बुधवारी गिता गावतुरे या महिलेला ठार केले. वनाधिकार्‍यांनी घटनेची माहिती दिली. परंतु, तब्बल दोन तासापर्यंत वनाधिकारी घटनास्थळी पोहचले नव्हते. त्यामुळे गावकर्‍यांत तीव्र असंतोष पसरला आहे.
 
गीता रायपूरे ही महिला विधवा असून, मागील पाच वर्षापूर्वी तिच्या पतीचा गंभीर आजाराने मृत्यू झाला. शेतमजुरी कयन दोन मुलांचा सांभाळ ती करायची. आता आई सोडून गेल्याने दानन्ही मुले पोरकी झाली असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.