अमरावतीत उद्या मतदान
   दिनांक :17-Apr-2019
मतदानासाठी प्रशासन सुसज्ज
  
 
अमरावती,
अमरावती लोकसभा मतदारसंघात उद्या गुरुवारी सकाळी ७ ते सायं ६ या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. अमरावतीतुन एकूण २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
 
संपूर्ण मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूकीच्या कामासाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी दक्षतापूर्वक सांभाळावी, असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. अमरावती लोकसभा मतदार संघात दोन हजार मतदार केंद्र असून १८ लाख ३० हजार ५६१ एकूण मतदार आहेत. यापैकी ९ लाख ४३ हजार ४४४ पुरुष, तर ८ लाख ८७ हजार ८० स्त्रिया व तृतीयपंथी ३७ मतदार आहेत. 
 
मतदान प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी चोखे सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात १८ महिला मतदान केंद्र आहेत.  तसेच जिल्ह्यातील १९९ मतदान केंद्राचे वेब कास्टिंग करण्यात येत आहे. ४ हजार बॅलेट युनिट, दोन हजार कंट्रोल युनिट व दोन हजार व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून मतदान प्रकिया पूर्ण होणार आहे.