मेडपली जवळ भीषण अपघात ३ ठार
   दिनांक :17-Apr-2019
गडचिरोली,
आज सकाळच्या सुमारास आल्लापल्ली येथुन भामरागड येथे आठवळी बाजाराकरिता निघालेल्या महिंद्रा आयशर पिकअप वाहन क्र. एम एच ३४ एम ३७२८ व पेरमिली (मांड्रा) येथील महिंद्रा मॅक्स काळी पिवळी वाहनात जोरदार धडक झाली. या धडकेत प्यासेंजर (काळी पिवळी) वाहनातील तीन व्यक्ती जागीच ठार झाले असुन त्यांचे नाव अद्याप कळू शकले नाही. तसेच या अपघातात ११ प्रवासी किरकोळ जखमी असुन त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. मृतकामध्ये दोन महिला व एक पुरुष असल्याची माहिती मिळाली आहे.
  
 
आलापल्ली वरून निघणारी बाजार गाडी हि नागेपल्ली येथील शिंदे यांची आहे तर पेरमिली (मांड्रा) येथील प्यासेंजर (काळी पिवळी) वाहन सुनील सुरमवार यांची आहे. सदर अपघात वाहनावरून नियंत्रण सुटल्याने झाला असल्याचा अंदाज आहे. या अपघाताबाबत पेरमिली येथील वैद्यकीय अधिकारी तूरकर, गायकवाड पोलीस उपनिरीक्षक यांना माहिती दिली असता ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील तपास सुरु आहे. यावेळी असिफ पठाण, प्रमोद आत्राम सरपंच पेरमिली, वंजा गावडे यांनी अपघात ग्रस्तांना प्राथमिक उपचाराकरिता मदत केली आहे. सकाळच्या सुरमारास मोठा अनर्थ झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.