आजचे राशी भविष्य, दि. १७ एप्रिल २०१९
   दिनांक :17-Apr-2019
 
 

मेष - नवीन ओळखी होण्याचे योग आहे. लोकांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. लोक आज तुमच्या प्रति सहानभूती दाखवतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन अधीक घट्ट होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्र परिवाराकडून मदतीची शक्यता आहे.

वृषभ - आज तुम्ही फार संवेदनशील असाल. प्रत्येक गोष्ट तथ्यांच्या आधारावर ठेवा. नोकरी, व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. कामात अडचणी येणार नाहीत. आज केलेल्या कामाचे फळ नक्की मिळेल. 

मिथुन - स्वत:वर विश्वास ठेऊन काम करा. व्यापार आणि नोकरीमधील कामे पूर्ण करण्यास दिवस चांगला आहे. नशिबाचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रगतीच्या चांगल्या संधी मिळताल.

कर्क -काही वरिष्ठ माणसे तुमच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत. आज तुम्ही बुद्धीच्या जोरावर कठीण कामे मार्गी लावाल. जास्त मेहनतीचे काम करण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आपत्यांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

सिंह  आजुबाजुच्या लोकांवर लक्ष ठेवा. ऑफिसमध्ये जबाबदारीची कामे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

कन्या - मित्रांसोबत वेळ घालवाल. व्यावसायात केलेले व्यावहार फायद्याचे ठरतील. कुटुंबाच्या जबाबदारीवर लक्ष ठेवा. व्यावसाय सुरळीत चालेल.

तुळ - वायफळ कामांवर वेळ न घालवता तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. तुमच्या विचारांमध्ये बदल होईल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. पैशांने एखादी मोठी समस्या दूर होईल. काही महत्त्वाच्या लोकांशी ओळख होईल.

वृश्चिक - धनलाभाच्या संधी येतील. पैशांसंबंधी यशदायक दिवस आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी विनम्रपणे वागल्यास पुढे जाता येईल. चांगली बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल.

धनु - मोठी कामे हाताळण्यात संपूर्ण लक्ष राहील. अनेक कामे वेळेत पूर्ण होतील. नवीन अनुभव मिळतील. आजचा दिवस व्यस्त राहील. साथीदासोबत चांगले संबध प्रस्थापित होतील. वाद मिटण्याची शक्यता आहे. नवीव नोकरी किंवा व्यावसायाच्या रूपरेषा तयार कराल.

मकर - कोणतेही काम जबाबदारीने करा. सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळाल. तुमचे काम दुसऱ्यांसाठी प्रेरणात्मक ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल. मेहनतीचं फळ खुप चांगले असणार आहे. व्यावसाय किंवा घरात काही नवीन बदल घडू शकतील.

कुंभ - आज तुम्ही आनंदी रहण्याचा प्रयत्न कराल. जो लोक तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे खोटे वागणे तुम्ही समजू शकता. मित्र, प्रेमि आणि नातेवाईकांसोबत घालवलेला वेळ चांगला ठरू शकतो.

मीन - मुलाखत किंवा नात्याबद्दल आज चर्चा होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही चांगले यश संपादन करू शकाल. आपत्यांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.