ऑस्ट्रेलियात हरिणाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू
   दिनांक :17-Apr-2019
वँगरट्‌टा, 
 
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतामधील ग्रामीण भागात हरिणाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या भागात अशा घटना दुर्मिळ आहेत. व्हिक्टोरिया राज्यात हरणाने बुधवारी सकाळी हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
 
यावेळी एक महिलाही गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेलबर्नच्या ईशान्य भागातील वँगरट्‌टा भागात हरणाला बेशुद्ध केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.