मी संघाबरोबर असणारे एक 'फर्स्ट-एड' किट- दिनेश कार्तिक
    दिनांक :17-Apr-2019
विश्वचषकाच्या संघात ऋषभ पंतपेक्षा निवड समितीची दिनेश कार्तिकला पसंती मिळाली. दिनेश कार्तिकच्या अनुभवाचा धोनीच्या अनुपस्थितीमध्ये संघाला फायदा होईल, असे सांगत निवड समितीने त्याच्या निवडीचे समर्थन केले. पण याबाबत खुद्द दिनेश कार्तिक याने थोडी विचित्र प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
माझ्या निवडीबाबत मला आनंद आहे. पण संघातील स्थानाबाबत बोलायचे झाले, तर जोवर महेंद्रसिंग धोनी मैदानात आहे, तोपर्यंत मी संघाबरोबर असणारे एक छोटेसे प्रथमोचार (‘फर्स्ट-एड) किट असणार आहे. विश्वचषक सामन्यात एखाद्या वेळी धोनी काही कारणाने मैदानात उतरू शकला नाही, तर त्याच्या जागी मला त्या वेळी केवळ एका दिवसासाठी ‘बँड-एड’ म्हणजेच तात्पुरती सोय म्हणून संघात स्थान मिळेल, अशा शब्दात कार्तिकने आपले मत स्पष्ट केले.
२०१७ मध्ये ज्यावेळी मी पुनरागमन केले, तेव्हाच माझा २०१९ विश्वचषक स्पर्धेचा प्रवास सुरु झाला होता. मी काही विशेष कामगिरी केली, तर मला संघात नक्की स्थान मिळेल अशी मला खात्री होती. म्हणून मी प्रयत्न केले आणि अखेर माझ्या संधीचे सोने झाले, असेही तो म्हणाला.