'मेंटल है क्या' जूनमध्ये होणार प्रदर्शित
   दिनांक :17-Apr-2019
अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता राजकुमार राव या दोन्ही नावांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आपल्याकडे आहे. या दोघांचा एकत्र चित्रपट येणार म्हटल्यावर प्रेक्षकांना त्याची उत्सुकता असणार हे नक्कीच. कंगना आणि राजकुमार यांचा 'मेंटल है क्या' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

 
 
'मेंटल है क्या' चित्रपट येत्या २१ जूनला देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु, कंगनाच्या आग्रहामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.
 
 
 
शैलैश आर. सिंह आणि एकता कपूर या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा एक सायकॉलॉजिकल थ्रीलर सिनेमा असावा. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुदी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.