शोधलं तर सापडतं!
   दिनांक :18-Apr-2019
 चेतन गाडगे 
जग फार वेगात बदलत आहे. इतक्या वेगात की ते बदल ते योग्य की अयोग्य कळेनासे झालेत. अशीच एक बदलत्या जागाची भेट म्हणजे सोशल मीडिया. घरातील प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आज सोशल मीडियावर आहे, अगदी लहानग्या बंडूपासून कुलकर्णी आजोबांपर्यंत. पण अतिरिक्त सोशल मीडियाचा प्रभाव हा आजच्या तरुण पिढीला खरं जग विसरायला भाग पाडत आहे. सोशल मीडिया हे खरं जग नाही आहे, खरं तर सोशल मीडिया हे जगच नाही आहे.
  
 
रोज होणार्‍या फॅन्सी इव्हेंटचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकणे गरजेचे असते आणि या मानसिकते मागे स्वतःला इतरांनपेक्षा अधिक सोशल व कूल सिद्ध करणे हाच एक मनोदय असतो. मग या मंडळींच्या प्रभावात येऊन इतर मुलं हेच करायला बघतात आणि ही सायकल अशीच सुरू राहणार. आपले अनुभव मित्रांना सांगितले पाहिजे, इन्स्टाग्राम, फेसबुकच्या पोस्ट वरती नाही तर प्रत्यक्षात. आयुष्य सुंदर आहे, त्यालाओळखा. पुस्तके वाचून, फिरायला जाऊन किंवा मित्रांमध्ये तास भर घालावून खरे अनुभव घ्या. मित्रांनो, सोशल मीडियाच्या पुढेही एक जग आहे आणि ते जग आहे वास्तव्याच जग. शोधलं तर नक्कीच सापडतं.