बजरंग कुस्तीच्या जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल
   दिनांक :18-Apr-2019
नवी दिल्ली,
भारताचा आघाडीचा पहिलवान बजरंग पुनिया याने युनायटेड वर्ल्ड रेसिंलगच्या नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक कुस्ती मानांकन यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्याला हे अग्रमानांकन 65 किलो वजनगटात प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी राष्ट्रकुल आणि आशियाड स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणार्‍या या 25 वर्षीय कुस्तीपटूने विश्व अिंजक्यपद स्पर्धेत रौप्य प्राप्त केले होते आणि त्याच्या नावे 58 मानांकन गुण जमा झाले होते.
 
 
रशियाचा अहमद चाकेव याच्या खाती फक्त 21 गुणच जमा होते. चीनमध्ये 23 मे पासून सुरू होणार्‍या आशिया अिंजक्यपद कुस्ती स्पर्धेची तयारी करीत असलेल्या बजरंगने याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे अग‘मानांकन मिळविले होते. त्याने मार्च महिन्यात बल्गेरियात दान कोलोव-निकोला पेट्रोव स्पर्धेतही सुवर्ण हस्तगत केले होते.