वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात ; तीन ठार
   दिनांक :18-Apr-2019
 
 
 
 चामोर्शी:  लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे पिकअप वाहन उलटून झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर १३ जण जखमी झाले. ही   घटना आज संध्याकाळी चामोर्शी तालुक्यातील भिवापूर नजीकच्या कालव्याजवळ घडली. मुकुंदा दिवाकर वासेकर(४५)रा.शिंतळा, ता.मूल, जि.चंद्रपूर, तुळशीराम शिवा बुरांडे(५५) व सुषमा बुरांडे (३५) दोघेही रा. इटोली, ता. बल्लारपूर, जि.चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत.

 
 
इटोली(मानोरा)येथील लग्नाचे वऱ्हाड एमएच ३४ बीजी ०५८५ क्रमांकाच्या पीकअप वाहनाने चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथे आले होते. लग्न आटोपल्यानंतर वऱ्हाड घेऊन पिकअप वाहन ईटोलीकडे जाण्यास निघाले. या वाहनात १६ ते १७ जण बसले होते. मात्र,दोन किलोमीटर पुढे जाताच भिवापूरनजीकच्या कालव्याच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन कालव्यात उलटले. यात तीन जण ठार, ६ गंभीर, तर ६ जण किरकोळ जखमी झाले. पार्वता देवतळे, भगवती दुधबळे, राजू पिपरे, शामसुंदर देवतळे, सावित्रीबाई वासेकर, बापूजी देवतळे, ताराबाई देवतळे, संगीता देवतळे, रामदास पिपरे, बापूजी देवतळे, माधुरी वासेकर, विमल चलाख, आनंदाबाई वासेकर अशी जखमींची नावे आहेत.
गंभीर जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.यात अनेक जनाचे हात पाय तुटले तर काहीना डोख्याला मार लागला आहे.