तैवानच्या राजधानीला भूकंपाचा तीव्र धक्का
   दिनांक :18-Apr-2019
तैपेई,
तैवानचे राजधानीचे शहर असलेल्या तैपेईला आज सकाळच्या सुमारास भूकंपाचा शक्तिशाली धक्का बसला. रिक्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता 6.1 इतकी नोंदविण्यात आली. तैपेई आणि पूर्व किनारपट्टीच्या शहरांना या भूकंपामुळे काही प्रमाणात नुकसान झाले.
 
 
 
हुलियन शहराच्या वायव्येकडे 19 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रिंबदू होता, अशी माहिती हवामान खात्याने दिली. या धक्क्यामुळे शहराच्या काही भागातील पाणी पुरवठा करणार्‍या पाईप लाईन्स फुटल्या होत्या आणि रेल्वे वाहतूकही काही काळासाठी विस्कळीत झाली होती. त्सुनामीचा धोका लक्षात घेऊन, किनारपट्‌टी भागातील शाळा तातडीने बंद करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. डोंगराळ भागातील काही टेकड्यांमधून दरडी कोसळल्याने, त्याखाली दबून काही नागरिक जखमी झाल्याचेही वृत्त आहे. तथापि, कुणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही, असे सूत्रांनी सांगितले.