बांगलादेशी कलाकाराला देश सोडण्याचा आदेश
   दिनांक :18-Apr-2019
नवी दिल्ली,
बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल कॉंगे्रसच्या निवडणूक प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या आणखी एका बांगलादेशी कलाकाराला तातडीने देश सोडण्याचा आदेश देण्यात आला.
 
 
 
गाझी अब्दुल नूर असे या कलाकाराचे नाव असून, यापूर्वी फरदौस अहमद या बांगलादेशी कलाकाराला याच कारणासाठी देशातून हद्दपार करण्यात आले होते. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही माझी नूर बंगालमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास होता. तृणमूलचे डमडम येथील उमेदवार सौगत रॉय यांच्यासाठी तो प्रचार करीत असल्याचे दिसून आल्यानंतर त्याला देश सोडण्याचा आदेश देण्यात आला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली.