लग्नापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
   दिनांक :18-Apr-2019
 
 
 
अकोला : लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्याबाबत नागरिकांमध्ये कमालीची जागरुकता दिसून येत असून, स्वत:च्या लग्नाला जाण्याआधी नवरदेवांनी मतदान केले.

 
 
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड व बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील दोन नवरदेवांनी लग्नाला जाण्याआधी मतदान केले.आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदविला.
तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील उमेश रामचंद्र खुमकर या नवरदेवाचे लग्न वऱ्हाड जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे जाणार असल्याने दूरचा प्रवास म्हणून सोबत जाणाºया शंभर वºहाडी मंडळीने नवरदेवा सोबत आपल्याला लोकशाहीने दिलेला मतदान अधिकार बजावला.यावेळी निवडणुक कर्मचाऱ्यांनी नवरदेवाला शुभेच्छा दिल्या.
बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील नवरदेव योगेश नागळे याने लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. सकाळीच त्याने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वऱ्हाडी मंडळींनीही मतदान केले व नंतर लग्नाला रवाना झाले.
जिल्ह्यातील या दोन्ही नवरदेवानी बोहल्यावर चढण्या आधी लोकशाहीच्या उत्सवात आपला आणि वऱ्हाडीचा सहभाग नोंदवला.