केसरी चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई
   दिनांक :18-Apr-2019
अक्षय कुमार आणि परिणिती चोप्राच्या केसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरू आहे. ‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारच्याकेसरीला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली असून यंदाच्या ‘बिगेस्ट ओपनर’ सिनेमांच्या लिस्टमध्ये ‘केसरी’ने दुसरे स्थान मिळवले आहे.

‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होता आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्याच दिवशी केसरीने २१. ५० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १६.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १८.७५ कोटींचा गल्ला जमावलाय. पहिल्या पाच दिवसांत केसरीने एकूण ७८.०७ कोटींची कमाई केली होती आणि आता तर या चित्रपटाने १५० कोटीचा टप्पा पार पाडला आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटाला मिळालेल्या या यशामुळे त्याचे फॅन्स प्रचंड खूश आहेत.
केसरी या चित्रपटाने या आठवड्यात देखील खूप चांगला व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. या चित्रपटाने सोमवारी ५० लाख तर मंगळवारी ६० लाख रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले. पण बुधवारी कलंक हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केसरी या चित्रपटाचे कलेक्शन खूपच कमी झाले. कलंक या चित्रपटामुळे केसरी या चित्रपटाला तितकेसे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर करता आले नाही. बुधवारी या चित्रपटाला केवळ ४० लाख रुपयेच कमावता आले. तरीही या चित्रपटाने आतापर्यंत १५३ कोटी रुपयांचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमावला आहे.