अकोलात तरुणाकडून ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्‍न
   दिनांक :18-Apr-2019
अकोला, 
देशभरात लोकसभेचे दुसर्‍या टप्‍प्‍यातील मतदानाची लगबग सुरु असताना अकोला जिल्ह्यातील कवठा गावातील एका मतदाराने मतदान केंद्रावरील ईव्हीएम फोडल्याची घटना घडली आहे. ईव्हीएमला विरोध असल्याचा दावा या मतदाराने केला आहे. श्रीकृष्ण घैरे असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
 

 
 
लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात आज, गुरुवारी १२ राज्यांतील ९५ जागांसाठी आज मतदान होत आहे. बाळापूरमधील कवठा येथे श्रीकृष्ण घैरे हा तरुण मतदान करण्‍यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला. मतदान करण्‍यास मतदान कक्षाजवळ जाताच श्रीकृष्णाने ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांने त्‍याला तात्‍काळ ताब्‍यात घेतले. या घटनेनंतर काही वेळातच नवीन मतदान यंत्र पाठवण्‍यात आल्यानंतर मतदानास सुरुवात झाली.
 
अकोला मतदारसंघात तिरंगी सामना रंगणार आहे. भाजपाचे संजय धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायत पटेल निवडणुकीच्‍या मैदानात आहेत.