मधुर भांडारकर तैमूरवर चित्रपट काढण्याची शक्यता?
   दिनांक :18-Apr-2019
बॉलिवूडमध्ये सगळ्यात कमी वयात 'स्टारडम' अनुभवणारी व्यक्ती म्हणजे तैमूर अली खान. तैमूरचा फोटो असो किंवा व्हिडिओ क्लिक केल्या केल्या व्हायरल झालाच म्हणून समजावा. अशातच, या सेलिब्रिटी स्टारकिडवर दिग्दर्शक मधुर भांडारकर चित्रपट बनवणार असल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती. परंतु, या अफवा असल्याचा खुद्द मधुर भांडारकर यांनी स्पष्ट केलंय.

 
 
मधुर भांडारकर यांनी आगामी चित्रपटासाठी ‘तैमूर’ या नावाची नोंदणी केल्याची माहिती मिळाल्याने या चर्चांना उधाण आलं. एका कार्यक्रमात मधुर भांडारकर यांना तैमूरच्या चित्रपटाविषयी प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचा खुलासा केलाय. याविषयी बोलताना भांडारकर म्हणाले की, मी असा कोणताही चित्रपट बनवत नाहीए. शिवाय, माझ्या प्रोडक्शन हाऊसकडून नेहमीच वेगवेगळी नावे रजिस्टर केली जात असतात. आम्ही 'अवॉर्ड', ‘बॉलिवूड वाइब्स’ अशी नावंसुद्धा रजिस्टर केली आहेत. केवळ नाव नोंदणी केल्याने आम्ही त्या नावावर आधारित चित्रपट बनवतो आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. सध्या मी वाळू माफियांवर आधारित ‘गालिब’ या चित्रपटाच्या कामांमध्ये व्यग्र आहे. बॉलिवूडमधील झगमगाट, सेलिब्रिटींचे फोटो काढण्यासाठी धडपडणारे फोटोग्राफर त्यामुळे टिकून राहिलेले 'पापराझी कल्चर' हे सगळे विषय 'तैमूर'च्या अनुषंगाने पडद्यावर मांडले जातील अशी चर्चा होती.