चर्चच्या पुनर्निर्माणासाठी युनेस्कोची मदत
   दिनांक :18-Apr-2019

न्यूयॉर्क,

आगीत भस्मसात झालेले मध्ययुगीन गॉथिक शैलीचे नोत्र देम कॅथेड्रल पुन्हा उभारण्याची तयारी युनेस्कोने दाखवली आहे. जागतिक वारसा केंद्राच्या संचालक मॅशिल्ड रॉसलर यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
 
 
 
बांधकामाचा अजोड नमुना असलेले हे चर्च वैश्विक प्रतीक असून ते बेचिराख झाल्याने जगभरात हळहळ व्यक्त होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.