'हा' विक्रम करणारा अमित मिश्रा पहिला भारतीय गोलंदाज
   दिनांक :19-Apr-2019
फिरोज शाह कोटला येथे घरच्या मैदानावर काल दिल्लीचा पराभव झाला असला तरी या समान्यामध्ये दिल्लीच्या संघातील फिरकी गोलंदाज अमित मिश्राने आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये दिडशे बळी घेणारा अमित मिश्रा हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
 
 
 
सामन्याच्या सातव्या षटकामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मिश्राच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि मिश्राने या विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये दिडशे बळी घेणार मिश्रा हा दुसरा खेळाडू आहे. या आधी हा टप्पा लसिथ मलिंगाने ओलांडला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदांच्या यादीमध्ये मिश्रा दुसऱ्या स्थानावर आहे.
 
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारे पाच गोलंदाज
१६१ बळी: लसिथ मलिंगा (श्रीलंका) सामने: ११४
१५० बळी: अमित मिश्रा (भारत) सामने: १४०
१४६ बळी: पियुष चावला (भारत) सामने: १५२
१४३ बळी: ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडीज) सामने: १२६
१४१ बळी: हरभजन सिंग (भारत) सामने: १५३