अमरावती विभागात ३३ लाख ३९ हजार मतदान
   दिनांक :19-Apr-2019
 
 
बुलडाण्यात सर्वाधिक मतदान
विभागात सरासरी 61.25 टक्के 
 
 
अमरावती: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात अमरावती विभागातील तीन लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी, 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. तीन लोकसभा मतदारसंघातील सुमारे 54 लाख 51 हजार मतदारांपैकी सुमारे 33 लाख 39 हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विभागाची मतदानाची टक्केवारी 61.25 आहे.
 

 
 
अमरावती विभागातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा या लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले.
अमरावती मतदारसंघातील एकूण 18 लाख 30 हजार 561 मतदारांपैकी 11 लाख 4 हजार 936 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 5 लाख 2 हजार 921 महिला, 6 लाख 2 हजार 8 पुरुष, तर 7 इतर मतदारांचा समावेश आहे. अमरावती मतदारसंघाची टक्केवारी 60.36 राहिली आहे.
 
अकोला मतदारसंघातील एकूण 18 लाख 61 हजार 759 मतदारांपैकी 11 लाख 16 हजार 763 मतदारांनी मतदान केले. यात 5 लाख 9 हजार 834 महिला, 6 लाख 6 हजार 922 पुरुष, तर 7 इतर मतदार आहेत. अकोला मतदारसंघाची मतदान टक्केवारी 59.98 आहे.
बुलडाणा मतदारसंघातील एकूण 17 लाख 58 हजार 943 मतदारांपैकी 11 लाख 17 हजार 486 मतदारांनी मतदान केले. यात 5 लाख 16 हजार 703 महिला, 6 लाख 782 पुरुष, तर एका इतर मतदाराने मतदान केले. बुलडाणा मतदारसंघाची मतदान टक्केवारी सर्वाधिक 63.53 आहे.
 
विभागातील 33 लाख 39 हजार 185 एकूण मतदारांपैकी 15 लाख 29 हजार 458 महिला, 18 लाख नऊ हजार 712 पुरुष, तर 15 इतर मतदारांनी मतदान केले.