आजचे राशी भविष्य, दि. १९ एप्रिल २०१९
   दिनांक :19-Apr-2019
 

मेष -  नवीन कामाची सुरूवात होईल. विचार केलेली कामं पूर्ण होतील. संपत्तीच्या कामाकडे लक्ष द्या. दिवस कुटुंबासोबत व्यतित होईल. महत्त्वाच्या कामासाठी योजना बनू शकते. तुमच्या जबाबदारीकडे पूर्ण लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा. तब्येतीची काळजी घ्या.

वृषभ - चुकीच्या गोष्टीमध्ये अडकू नका त्यामुळे हातून संधी जाण्याची शक्यता आहे. आज कोणताही निर्णय घेऊ नका. गोंधळलेली परिस्थिती राहील. दिवसभर सावध राहा. विचार करून बोला. दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वाहन चालवताना सावध राहा. तब्येत चांगली राहील.

मिथुन - नवीन संधी मिळू शकते. समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन ऑफर मिळू शकते. विचार केलेली कामं पूर्ण करा, त्यात यश मिळेल. दररोजची कामं पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत. पुढे जाल. महत्त्वाची कामं करण्यासाठी दिवस चांगला आहे. समस्या लवकर संपण्याची शक्यता आहे.

कर्क - प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील. कोणत्याही कामात हलगर्जीपणा करू नका. विचार केलली कामं पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. कोणत्याही कामासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा, काळजी घ्या.

सिंह - विचार केलेली कामं पूर्ण होणार नाहीत. अनेक विचार मनात येतील. पैसे सांभाळून खर्च करा. कटू बोलू नका. मनातील अनेक समस्यांमुळे कामात लक्ष लागणार नाही. कोणतीही योजना आज आखू नका. तब्येत चांगली राहील.

कन्या - व्यवसायात एखाद्या नव्या योजनेवर काम सुरू होऊ शकते. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. कामं पूर्ण होतील. महत्त्वाच्या लोकांशी ओळख होईल. उत्साही राहाल. कामात लक्ष द्या. एखादा नवीन विचार मनात येऊ शकतो.

तुळ - नोकरी, व्यवसायात अचानक काही निर्णय घ्यावे लागू शकतात. नुकसान होण्याची शक्यता आहे. गोंधळ वाढेल. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नको असलेल्या व्यक्ती जवळपासच राहतील. तब्येतीत चढ-उतार राहील.

वृश्चिक - दिवस चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेऊन कामं पूर्ण होऊ शकतात. कामात मन लागेल. अचानक काही चांगल्या संधी मिळतील. मनात काही नवे विचार येतील, ते पुढील कामासाठी फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबतच्या संबंधांसाठी दिवस चागंला आहे. दिवस चागंला आहे. तब्येत चांगली राहील.

धनु - आर्थिक समस्या सोडवल्या जातील. वैवाहिक जीवन आनंददायक राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मोठी समस्या सोडवली जोऊ शकते. नोकरी-व्यवसायातील समस्या संपतील. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.

मकर - दिवसभर सावध राहावे लागेल. काही लोकं स्वत:च्या फायद्यासाठी तुमच्यासमोर समस्या उभ्या करू शकतात. मनात अनेक विचारांमुळे गोंधळ होईल. जुन्या गोष्टीमध्ये अडकून राहाल. समस्यांचे निराकरण लवकर होणार नाही. कामात मन लागणार नाही.

कुंभ -  पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कामातील समस्या संपण्याची शक्यता आहे. तुमच्या योजनांना यश मिळेल. राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. अनेक समस्या सोडवल्या जातील.

मीन - व्यवसायात काही नवीन करण्याच्या नादात समस्या वाढण्याची शक्यता आहे. मनातील विचारांनी कामात लक्ष लागणार नाही. नोकरी-व्यवसायात घाई करू नका. एखाद्या गोष्टीबाबत व्यावसायिक जीवनात समस्या वाढू शकते. केलेल्या कामाचा परिणाम न मिळाल्यास काळजी करू नका. तब्येतीसाठी दिवस चांगला नाही. वेळेवर जेवण करा.