आगीत होरपळून पाच जनावरांचा मृत्यू
   दिनांक :19-Apr-2019
 
 पारडी : आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पारडी गावातील हेटि गावच्या बाजूला गावठाणवर असलेल्या गोठयाला अचानक आग लागली आग लागताच गोठ्यात असलेल्या व गोठ्याबाहेर असलेल्या जनावरणाचा वैरण कडबा कुटारा असल्यामुळे कडबा कुटारने जबर आग पकडली व आगीचे ने मोठे रूप धारण केल्याने गोठ्याबाहेर बांधलेल्या काही जनावरांना आगीचे चटके लागल्याने जनावरे सैरावैरा पळू लागले तर काही जंगलात पळाले तर काही जनावर खुंट्यावरून न सुटू शकल्या मुळ्ये त्यानंच आगीत होरपळून मृत्यू झाला यात गोठ्यातील शेती साहित्य बैल गाडी जाळून खाक झाली गावातील नागरिकांना ही आग दिसली त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला पण आग मोठया प्रमाणात पसरल्यामुळे घटनास्थळी आर्वी ,आष्टी येथील अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविले घटनास्थळी तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवी राठोड हे घटनास्थळी होते
यात दिनबाजी सयाम यांची एक बैल एक गाय जाळून मरण पावले व चार जनावरे भाजले, नामदेव डोमजी कोडपे यांचे १४ गोने कुटर १ लाकडी बंडी पूर्ण शेती साहित्य खाक झाले किसनाजी डोमजी मारस्कोहलें यांचे १० गोने कुटर खाक झाले मुकीदा हरिभाउ चाफले यांचा गोठा जळला व ३ जनावरे मृत्यू दोन गाय एक वासरू 4 जनावरे जखमी शेतीचे साहित्य खाक बैलजोडी जखमी झाली
शिवराम भलावी १० गोने कुटार जनावरांचा चारा जळाला मोहन चाफले गोठा शेती साहित्य नुकसान झाले यात जखमी जनावरांना कारंजा येथील पशु पर्यवेक्षक प्रमोद पाटील उपचार करत आहे.