माझा 'हेलिकॉप्टर शॉट' धोनीला आवडतो : हार्दिक पंड्या
    दिनांक :19-Apr-2019
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ४० धावांनी मात करत आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपलं स्थान भक्कम केलं आहे. मुंबईचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फलंदाजीदरम्यान हार्दिकने १५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान अखेरच्या कगिसो रबाडाच्या अखेरच्या षटकामध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळत सर्वांची वाहवा मिळवली.
 
 
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना हार्दिक पांड्याने, धोनीलाही आपला ‘हेलिकॉप्टर शॉट’ आवडत असल्याचं सांगितलं आहे. “एखाद्या सामन्यात मी हेलिकॉप्टर शॉट खेळेन याची कल्पनाही केली नव्हती. नेट्समध्ये मी या फटक्याचा सराव करत होतो. मी एकदा धोनीच्या रुमवर जाऊन, त्याला माझा फटका आवडला का असं विचारलं, तो लगेच हो असं म्हणाला.” दिल्लीविरुद्ध सामन्यात हार्दिकला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले.