पायांनी विमान उडवणारी जेसिका!
   दिनांक :19-Apr-2019
सिएरा व्हिस्टा,
अमेरिकेतील जोसिका कॉक्स ही जगातली पहिली आणि एकुलती एक खांदेविहीन वैमानिक आहे. जेसिका तिच्या पायांनी विमान उडवते. तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. जेसिकाचा जन्म 1983मध्ये अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये झाला. जन्मत:च तिला हात नव्हते. सुरुवातीला तिने कृत्रिम हातांचा वापर केला. पण 14वर्षांची झाल्यावर तिने कृत्रिम हातांना दूर केले आणि सर्व कामे ती पायांनी करु लागली. जेसिकाने वयाच्या 22व्या वर्षी विमान उडवणे शिकले आणि केवळ तीन वर्षात तिला परवानाही मिळाला. जेसिका ही तायकांडोमधील ब्लॅक बेल्टधारक असून, जगातील ती पहिली ‘आर्मलेस ब्लॅकबेल्ट’धारक आहे.
 

 
 
जेसिका तिच्या पायांचा वापर हातांप्रमाणेच करते. ती पायांच्या मदतीने कार चालवते, गॅस भरते, डोळ्यांच्या लेन्सेस लावते, स्कू बा डायिंवग करते आणि कीबोर्डवर पायांनीच टंकलेखनही करते. आश्चर्याची बाब म्हणजे तिची टंकलेखनाची गती मिनिटाला 24 शब्द आहे. 36 वर्षीय जेसिकाचे लग्न झाले आहे. जेव्हा तिचे लग्न झाले होते, तेव्हा तिच्या होणार्‍या पतीने पॅट्रिक चेंबरलेनने तिच्या पायातच ‘वेिंडग रिंग’ घातली होती. जेसिका एक उत्तम वक्ताही आहे. प्रेरणादायी व्याख्याने ती देत असते. तिच्या िंहमतीला आणि जिद्दीला सलाम करावा असेच तिचे जगणे आहे.