सलमानच्या 'भारत' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
   दिनांक :19-Apr-2019
सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या 'भारत' या सिनेमाचे नुकतेच पोस्टर लाँच करण्यात आले आहे. हे पोस्टर सलमान खानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना एकत्र दिसत आहे. 'प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे दु:ख लपलेलं असतं;हेच दु:ख आपल्याला जिवंत ठेवतं.'असं पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तसेच पोस्टरवर सिनेमाच्या नावाव्यतिरिक्त सिनेमाची टॅगलाइन लिहिली आहे. पोस्टरमध्ये १९९० सालातला काळ दाखवला आहे.
 
 
अली अब्बास जाफर यांच्या या सिनेमात जॅकी श्रॉफ, तब्बू, दिशा पटानी आणि सुनील ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका बघायला मिळणार आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लाँच करण्यात येणार आहे.