सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षणाची गरज
   दिनांक :19-Apr-2019
 
 
देव्हाडा: ग्रामीण सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योग उभारण्यासाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शनाची गरज व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुशिक्षित बेरोजगार कामाच्या शोधात भटकंती करताना दिसतात. मात्र रोजगार उपलब्ध होत नसल्याने नैराश्याचे जीवन जगत आहेत. नैराश्येच्या गर्तेत काही युवक व्यसनाधीन झाले आहेत. नोकरीच्या संधी असल्या तरी योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाअभावी बेरोजगारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी ग्रामीण भागातच मार्गदर्शन व प्रशिक्षणाची सोय संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून देण्याची गरज आहे.