माझा धोनीवर विश्वास : विराट कोहली
   दिनांक :19-Apr-2019
मुंबई,
 
कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. आमच्याकडे स्टम्पच्या मागे धोनीसारखा खेळाडू असल्याने  मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असं कोहली म्हणाला.
 
 
धोनीचं नेतृत्वकौशल्य आणि अनुभव संघासाठी नेहमीच फायदेशीर ठरतो. मैदानावर विराटला आणि इतर खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्याला आपण नेहमीच बघितलं आहे. विराटही त्याचं कौतुक करत असतो. यावेळीही त्याने धोनीचे तोंडभरून कौतुक केले आहे. माझा धोनीवर खूपच विश्वास आहे. आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. स्टम्पच्या मागे धोनीसारखा खेळाडू आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण बरेच जण त्याच्यावर टीका करतात हे देखील दुर्दैवी आहे, असं कोहली म्हणाला.
धोनी सुरुवातीला माझ्या पाठिशी ठाम उभा राहिला होता हे मी कधीच विसरू शकत नाही. त्यानं मला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. त्यानं मला संधी दिली आणि मी ती साधली. पण त्यावेळी मला पाठिंबा मिळणे  गरजेचे होते . बऱ्याच युवा फलंदाजांना तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी सहजासहजी मिळत नाही, अशी आठवणही कोहलीने  सांगितली.