दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्र दहावा
   दिनांक :19-Apr-2019
मुंबई :
लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान काल (गुरुवारी) पार पडलं. या टप्प्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी कमी दिसून आली. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी ६१.७९ टक्के मतदानाची नोंद झाली.
 
 
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर या सहा, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा या तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, अशा दहा मतदारसंघात मतदान झाले. बीडमध्ये सर्वाधिक (६४.५८ टक्के) मतदानाची नोंद झाली, तर बुलडाणावासियांनी मतदानाला सर्वात कमी (५७.९५ टक्के) प्रतिसाद दिला.
बीड- ६५.५८ टक्के, (परळीत 66.47 %)
हिंगोली- ६३.३७ %
अमरावती- ६३.०८ %
नांदेड- ६२.९७ %
उस्मानाबाद- ६२.७५ %
परभणी- ६२.४७ %
लातूर- ६२.०२ %
अकोला- ५९.७६ %
सोलापूर- ५८.५७ %
बुलडाणा- ५७.९५ %
दुसऱ्या टप्प्यात देशभरात सरासरी ६७.७३ टक्के मतदान झालं. यापैकी मणिपूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच ७७.८६ टक्के मतदान झालं. तर जम्मू काश्मिरमध्ये सर्वात कमी म्हणजेच ४५.६४ टक्के मतदानाची नोंद झाली. ज्या बारा राज्यांमध्ये काल मतदान झालं, त्यात मतदानामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दहावा आहे.
मणिपूर - ७७.८६ %
पुद्दुचेरी- ७७.४९ %
पश्चिम बंगाल- ७६.४२ %
आसाम- ७६.४२ %
छत्तीसगड- ७३.०५ %
तामिळनाडू- ७१.३२ %
कर्नाटक- ६८.१६ %
उत्तरप्रदेश- ६२.०६ %
बिहार- ६२.०४ %
महाराष्ट्र- ६१.७९%
ओडिशा- ५८.७५ %
जम्मू-काश्मिर- ४५.६४ %