'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात ?
   दिनांक :02-Apr-2019
सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. सिनेसृष्टीतील विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवे लव्ह बर्ड्स सखी गोखले आणि सुव्रत यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा आहे.
 

 
 
ते कायमच एकत्र पाहायला मिळतात. कोणताही कार्यक्रम असो, कॉफी घेणे असो किंवा मग सिनेमाला जाणं असो दोघंही त्याचे फोटो रसिकांसह सोशल मीडियावर शेअर करतात. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. आता सखी गोखलेच्या एका फोटो ती लग्न करणार असल्याचे समजतंय. तिच्या या फोटोला खूप सारे शुभेच्छा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. यावर सखीने कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नसले तरीही सखी आण सुव्रत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून सनई चौघडे कधी वाजणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.
 
दिल दोस्ती दुनियादारी मालिकेत दोघांनीही एकत्र काम केले होते. मालिकेच्या सेटवरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. दोघांचे सोशल मीडियावर असलेले एकत्र फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये हे दोघे अफेअरमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगली होती. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुव्रतने सखीसाठी टाकलेली पोस्ट पाहिल्यानंतर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे निश्चित झाले होते. तसेच सखी शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असल्यामुळे तिने अमर फोटो स्टुडिओ या नाटकातून एक्झिट घेतली होती.