आजचे राशी भविष्य, दि. ०२ एप्रिल २०१९
   दिनांक :02-Apr-2019
मेष : अनेक अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबीक संबंधांमध्ये सुधारणा होईल. तुमची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. तुमच्यासाठी आजचा दिवस उत्साही असेल. कौटुंबीक गोष्टींवर लक्ष द्या. वैवाहिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
 
वृषभ :  कार्यक्षेत्रात व्यग्र असाल. कामाच्या ठिकाणी इतरांकडून आदर मिळेल. मेहनतीने अर्थार्जनाची संधी उपलब्ध होईल. अनेक दिवसांपासून ज्या कामांमध्ये अडथळा आला होता ती पूर्णत्वास जातील. अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही सक्रिय असाल. प्रवासयोग आहे.
 
मिथुन :  घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक गोष्टींवर लक्ष द्या. अवाजवी खर्च होण्याची संधी आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये काही अडचणी उदभवतील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी असणारा तणाव वाढेल. पोटाच्या विकारांमुळे त्रास होऊ शकतो.
 
कर्क : कुटुंबात सुख- शांती नांदेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यापारात नवे करार होण्याची चिन्हं आहेत. चांगल्या मित्रांशी भेट होऊ शकते. दूरगामी विचार कराल. नोकरीच्या ठिकाणी कोणी एक व्यक्ती नकळतपणे तुमची मदत करत असेल.
 
सिंह : नोकरीच्या ठिकाणी अडचणी येतील. दैनंदिन कामंही पूर्णत्वास जाण्यास अडचणी येतील. हट्टीपणा कराल तर कोणा एका व्यक्तीशी वाद होऊ शकतो. विचार करण्यात वेळ वाया घालऊ नका. झोप कमी असेल. डोकेदुखी आणि डोळ्यांचा त्रास सतावू शकतो.
 
कन्या : व्यापारात वाढ होईल. कनिष्ठांचं सहकार्य मिळेल. काही खास व्यक्तींने भेटण्याची संधी मिळेल. दैनंदिन कामाच्या व्यापातून सुटका होईल. तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. मोठ्यांचंही सहकार्य लाभेल. दिवस थकवणारा असेल. विश्रांती घ्या नाहीतर अडचणी येतील.
 
तूळ :  नोकरी आणि व्यापारात लाभ होण्याची चिन्हं आहेत. दिवस चांगला आहे. विशेष लाभ आणि प्रगती होण्याची चिन्हं आहेत. इतरांना नाराज केल्याशिवाय स्वत:ची कामं पूर्णत्वास नेण्यास भर द्या. साथीदारावर रागवू नका. इतरांवर तुमच्या भावना लादू नका.
 
वृश्चिक : दैनंदिन कामं पूर्ण होतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हं आहेत. कुटुंब आणि समाजात मिळणारी प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि चांगल्या संधी मिळतील.
 
धनु : व्यापारात कमी फायदा होईल. बदलीचा योग आहे. कोणतं नवं काम सुरू करु नका. आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असेल. विचार केलेली कामं पूर्ण होणार नाहीत. साथीदाराची वर्तणूक चांगली नसेल.
 
मकर : नव्या करारांचा विचारही करु नका. पैसे अडकू शकतात. दिवसाची सुरुवात चांगली नसेल. मनाविरुद्ध पैसे खर्च करावे लागतील. आज आखलेले बेत तुमच्यापुरते मर्यादीत ठेवा. वादांमध्ये अडकू नका. जेवणाची काळजी घ्या. 
 
कुंभ : आर्थिक अडचणी संपुष्टात येतील. खर्च आणि मिळकत समसमान असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. चांगल्या व्यक्तींची सोबत फायद्याची ठरेल. प्रयत्नांनी काही समस्या सोडवण्याचे प्रयत्न करा. कोणत्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल तर धीराने घ्या आनंदच मिळेल.
 
मीन : व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने विचार करा. गोष्टी जशा सुरु आहेत, तशाच राहुद्या. महागड्या वस्तूंची खरेदी करु शकता. आज एखादा मोठा निर्णय घेतलात तर तो फायद्याचा ठरेल.